जळगाव: जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागातर्फे जिल्हा परिषद भवनात बाह्यरुग्ण कक्ष सुरु करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. मंगळवारी 2 एप्रिल रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर, शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, डॉ.प्रमोद पांढरे, डॉ.समाधान वाघ, कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे आदी उपस्थित होते. सदरील बाह्यरुग्ण कक्ष दररोज सकाळी १० ते १ व दुपारी 3 इ ६ वाजेदरम्यान सुरु असणार आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या किरकोळ आजार व रक्तदाब, मधुमेहावरील निदान केले जाणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी २७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. औषध निर्माण अधिकारी शोभा खडके, बी.टी.सूर्यवंशी, आरोग्य सहाय्यक विजया पाटील आदी सेवा देत आहे.