धुळे । जिल्हा परिषद अभियंता नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता मिळावी, अभियंत्यांना प्रवास भत्त्यापोटी दरमहा 10 हजार रुपये मासिक वेतनासोबत देण्यातयावे, यासह विविध मागण्यांसाठी जिपचे कनिष्ठ शाखा अभियंते दोन दिवसांच्या सामुहिक रजेवर उतरले आहेत. जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन चालविले आहे. मागण्यांचे मुख्य कार्यकारी अधिंकारी गंगाथरन डी. यांना निवेदन देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन
जिल्हा परिषदेकडील अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु त्याची ग्रामविकास विभागाने अंमलबजावणी केले नाही. याबाबत आदेश पारित करावेत, कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलनात अभियंता संजय बागूल, डी. एस. बांगर, ज्ञानेश्वर विसपुते, प्रशांत बेडसे, दिलीप पाटील, एन. डी. पाटील, विनय खैरनार, प्रकाश पवार, उमेश चौधरी, अमित शिंदे, भिमराव फुलपगारे, दिलीप पाटील, सुनिल पाटील, राजेंद्र महाजन, जितेंद्र गवते, सुधीर शेवाळे, अभिमन्यु बिर्हाडे यांच्या अन्य अभियंते सहभागी झाले होते.