जि.प.चे नवनियुक्त सीईओ दिवेगावकरांनी घेतला पदभार

0

जळगाव । गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पदाचा अतिरिक्त भार असलेले कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी 28 रोजी ते जिल्हा परिषदेत दाखल झाले व त्यांनी पदभार स्विकारला. कौस्तुभ दिवेगावकर हे 2013 वर्षाच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मुळचे लातुरचे आहेत. डिसेंबर 2015 मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून गडचिरोली येथे रुजु झाले होते. अस्तिककुमार पांण्डेय यांची अकोला जिल्हाधिकारीपदी नियुक्त झाल्याने त्यांच्या जागी दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवेगावकर हे सकाळीच जिल्हा परिषदेत दाखल झाले. रात्री उशीरापर्यत ते जिल्हा परिषदेत थांबुन होते. अक्षय तृतीया निमित्त जिल्हा परिषदेला सुट्टी असतांनाही त्यांनी पदभार घेतला.