जि.प.च्या कनिष्ठ अभियंत्यासह शिपाई जळगाव एसीबीच्या जाळ्यात

0

बिल काढण्यासाठी साडेचार हजारांची मागणी भोवली ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा

जळगाव- काँक्रिटीकरण कामाचे बिल काढण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांकडे चार हजार 500 रुपयांची लाचेची मागणार्‍या जळगाव जिल्हा परीषदेतील बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता पी.डी.पवार (रा.प्लॉट नं.20, गौरी पार्क, वीर सावरकर नगर, पिंप्राळा, जळगाव) व कंत्राटी शिपाई .मंगेश गंभीर बेडीस्कर (35, रा.प्लॉट नं.5, पार्वती नगर, मोहाड़ी रोड, महाबळ जळगाव) यांना शुक्रवारी सायंकाळी जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. संशयीत आरोपींनी लाचेची मागणी (डिमांड) केल्याचा पुरावा एसीबीला मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पेठ पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या कारवाईने बांधकाम विभागातील लाचखोर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उउडाली आहे.

लाचेची मागणी सिद्ध झाल्याने गुन्हा
20 तक्रारदाराला सुशिक्षीत बेरोजगार अभियंता नोंदणीनुसार प्रमाणपत्र मिळाले असून त्यांनी जळगाव बांधकाम उपविभाग कार्यालयामार्फत काँक्रीट करण्याचे कंत्राट मिळवल्यानंतर कामही पूर्ण केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्याच्या मागणीसाठी दोघा आरोपींनी 11 फेब्रुवारी रोजी लाच मागितली होती व तसा पुरावा एसीबीला प्राप्त झाल्यानंतर 22 रोजी आरोपींना अटक करीत त्यांच्याविरुद्ध जळगाव जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, मनोज जोशी, शामकांत पाटील, जनार्धन चौधरी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.