जळगाव । जिल्हा परिषदेच्या पंचववार्षीकच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची नावे जाहिर करणे अनिवार्य असते. असे असतांना या पंचवार्षीकची पहिली सर्वसाधारण 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या दहा विषय समिती सदस्य निवडीचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात आले होते. दोन आठवडे उलटल्यानंतरही सदस्य निवड करण्यात झालेली नाही. मंगळवारी जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यात नावाबाबत चर्चा झाल्याचे समजले मात्र सदस्यांची नावे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. विषय समिती सदस्यनिवडीवर भाजपातील अंतर्गत वादामुळे ग्रहण लागले आहे. भाजपातील अंतर्गत वादामुळेंच विषय समिती सदस्य निवडणे अवघड बनले आहे. एक दोन दिवसात नावे जाहिर करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाच्या समितीत पदे मिळविण्यावरुन स्पर्धा निर्माण झाल्याने देखील सदस्य निवड लांबणीवर आहे. पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी सर्व प्रकारची चाचपणी पदाधिकार्यांमार्फत सुरु आहे.