जळगाव: कोरोनाचा थैमान सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने जिल्हा परिषदेने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रोम होमचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी
बुधवारी हे आदेश दिले. ३ ते ७ ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचे आदेश सीईओ यांनी दिले आहे. अत्यावश्यक कामासाठी जिल्हा परिषदेत आल्यास खाते प्रमुखांशी चर्चा करण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. १० ऑगस्टपासून नियमित कार्यालये सुरु राहणार आहेत.
जिल्हा परिषदेतील काही पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बहुतांश कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.