जि.प.निवडणूक: भाजपकडून रंजना पाटील तर सेना-राष्ट्रवादीकडून रेखा राजपूत उमेदवार !

0

जळगाव: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आज शुक्रवारी ३ रोजी होत आहे. भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येऊन अर्ज दाखल करण्यात आले आहे. भाजपकडून रंजना प्रल्हाद पाटील (ऐनपूर-खिरवड गट) यांचा तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून शिवसेनेच्या रेखा दीपक राजपूत (लोहारा-कुऱ्हाड गट)यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून उपाध्यक्षपदाची उमेदवारी लालचंद प्रभाकर पाटील (नशिराबाद-भादली गट) यांना तर शिवसेना राष्ट्रवादी आघाडीकडून उपाध्यक्षपदाची उमेदवारी जयश्री पाटील (जळोद-कळमसरे गट) यांना उमेद्व्री देण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले असून दुपारी ३ वाजता निवड प्रक्रिया सुरु होईल.

भाजपकडेच सत्ता कायम राहण्याची शक्यता असून रंजना पाटील ह्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून रंजना पाटील तर उपाध्यक्ष म्हणून लालचंद पाटील लाभणार आहे.