चिबंळी। मोई ता.खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितिन काळूराम फलके तर उपाध्यक्षपदी लंका संदीप गवारे, शिक्षक प्रतिनिधी रशीला यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्याध्यापक कैलास कानडे यांनी दिली मोई (ता खेड ) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्यात शालेय व्यस्थापन समितीच्या सदस्यांची इच्छुक उमेदवार यांची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली.शालेय व्यवस्थापन समितीवर निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य शिक्षक प्रतिनिधी यांचा सत्कार सरपंच अनुराधा गवारे, उपसरपंच सारिका गवारे, पोलीस बिट अंमलदार दत्ता जाधव, पोलीस पाटील नारायण बिडकर, भाजप युवा मंच अध्यक्ष राहुल गवारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मोई जि.प.शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी ग्राम सदस्य अरुण फलके,महेश गवारे, रुक्ममिनी फलके, उषा फलके, सुरेख फलके, अनिल गवारे, कृष्णा गवारे, वनिता भट, नेताजी चोघुले, राहुल वाठोरे, शितल दामोदरे, शिक्षक प्रतिनिधी रशीला पानगे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी तंटा मुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब गवारे, सादिक गवारे, आनंद गवारे, ग्राम सदस्य संदीप जाधव, मारुती येळवंडे, शैलेश फलके, समीर गवारे, संतोष गवारे, रोहिदास गवारे, आण्णा करपे, बाळासाहेब गवारी, पोलीस हवालदार भोसले व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर अध्यक्ष नितीन फलके म्हणाले की सर्वांना बरोबर घेऊन शाळेतील विध्यार्थीसाठी शैक्षणिक गुणवत्ता ,सोयी-सुविधा देण्यासाठी दानशूर ग्रामस्थांकडून मदत मिळविण्याचा तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचा पर्यंत करू. पुढील काळात सेमी इंग्रजी वर्ग, ई-लर्निंग प्रोजेक्टर, स्वतंत्र संगणक कक्ष, विविध खेळ, स्पर्धा परीक्षा तयारी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. चांगल्या प्रकारे नियोजन करून मुलांनासाठी मध्यान्ह भोजन आहार आदी कामे करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.