जळगाव: जि.पच्या ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक पी.आर.चौधरी हे गेल्या २० वर्षापासुन एकाच टेबलवर कार्यरत असुन त्यांची बदली केली जात नाही.तसेच ग्रा.प विभागासह अन्य विभागात कर्मचाऱ्यांना देखील एकच विभागात ५ वर्ष झाले असतांना त्यांच्या बदल्या होत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात यावा अशी मागणी जि.प.सदस्या अरूणा पाटील व माजी जि.प सदस्य आर.जी.पाटील यांनी सीईओंकडे निवेदनाव्दारे केली आहे.
दरम्यान सामन्य प्रशासन मध्ये देखील चुकीच्या पदोन्नत्या झाल्या असल्याने त्या रदद्द कराव्यात अन्यथा उपोषणचा ईशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले कर्मचारी वरिष्ठ सहाय्यक पी.आर.चौधरी हे १८ नोव्हेंबर १९९८ पासुन एकाच टेबलावर कार्यरत आहे.फक्त प्रमोशन झाले त्यावेळी ३ महीने बाहेर गेले परंतु परत ग्रा.प विभागात येवून २० वर्षापासुन एकाच टेबलावर आहे. ज्या टेबलावर ते काम करतात तेथे दररोज कमीत कमी २० ते २५ हजाराची कमाई असल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले आहे. एका विभागातुन बदली झाली म्हणजे त्या विभागात परत बदली करता येत नाही असे असतांना नियम धाब्यावर बसवून वरिष्ठ चौधरींना पाठीशी घालत आहे.त्यांची १५ दिवसात बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जि.प सर्व विभागीय कार्यालयात ५ वर्षापेक्षा जास्त दिवस झालेल्या सर्व कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात याव्यात तसेच सामान्य प्रशासन विभागात अधिक्षक पदामध्ये कर्मचारी यांना चुकीची पदोन्नती दिली आहे. ती तात्काळ रद्द करावी अन्यथा २४ नोव्हेंबर पासुन जि.प समोर उपोषण करण्यात येईल असा ईशारा जि.प सदस्या अरूणा पाटील व माजी जि.प सदस्य आर.जी.पाटील यांनी दिला आहे.