जि.प.शाळेतून पोषण आहाराची चोरी

0

निजामपुर । साक्री तालक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर जिल्हा परिषद कन्या शाळेतून लहान मुलाचे शालेय पोषण आहारासाठी वापरली जाणारे तादुळ, धान्य, डाळी , तेल, जिरे. हळदी, मीठ, मिरची इतर साहित्य चोरून नेलयाची फिर्याद मुख्याध्यापिका सरला चन्ने यांनी निजामपुर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ एम. आर. जाधव, पोकॉ नाईक वामन चौधरी करीत आहे.

मुख्याध्यापकांच्या कार्यालयात ठेवला साठा
याबाबत सविस्तर माहिती असे की शनिवारी सकाळी 11 वाजता निजामपुर जिल्हा परिषद कन्या शाळा सुटली रविवारी व नाताळ सणाची दोन दिवस सुट्टी होती. सुटीनंतर सौर पँनलचे कार्यक्रम असल्याने शाळा सकाळी 7 वाजता नेहमी प्रमाणे मुख्याध्यापिका सह शिक्षक कर्मचारी शाळेत आल्यावर शाळेचे मुख्याध्यापक कार्यालयाचे कुलुप तोडून चोरट्यांनी शालेय पोषण आहार बनविण्यासाठी आलेले 23 हजाराचे धान्य व साहित्य चोरून नेल्याचे उघडकीस आले. शाळेला 18 डिसेंबरला विद्यार्थ्यांना भोजनासाठी धान्य धान्यादी योजने अंतर्गत 16 कट्टे तादुळ 31 किलो मुगदाळ 34 किलो मटकी मसुरदाळ मुग वाटाणा 20 किलो तेल जिरे मोहरी हळदी मिरची मीठ यांच्या पुरवठा झाला होता. हासाठा मुखाध्यापाक कार्यालयाच्या खोलीत ठेवला होता.