पहूर । पहूर पेठ येथील जि.प संतोषीमाता नगर शाळेत शिक्षक पालक मेळावा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच तथा ग्रामपंचायतीचे सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रदीप लोढा, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ शरद बेलपत्रे, सदस्य फिरोज तडवी, बाळू दांडगे, पहूरबीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.सी.धनके आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी शालेय गणवेश, विद्यार्थी लाभाच्या योजना, शाळेच्या भौतीक सुविधा, विद्यार्थी उपस्थिती तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढ संर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन
पी.टी.पाटील यांनी पालकांसमोर बोलतांना सांगितले की, पालकांनी आपल्या पाल्याकडे नियमित लक्ष देवून दररोज शाळेत पाठवावे. आपला पाल्य हा घरी आल्यावर अभ्यास करतो किंवा नाही हे पहावे. तसेच शाळेच्या भौतीक सुविधा पुर्ण करण्यसाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. माजी सरपंच प्रदीप लोढा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पालकांनी आपला पाल्याचे नाव हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच दाखल करावे. संतोषी मातानगर परिसरातील नागरिक तसेच पालक हे सुशिक्षित आणी समजदार व जागृक आहेत. संतोषी मातानगरची शाळा ही खरोखरच आदर्श व आयएसओ मानांकन प्राप्त आहे. सर्वच शिक्षक हे प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य करत आहे. सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील यांनी सांगितले की, गावाच्या विकासापेक्षा शाळेचा विकास फार महत्वाचा आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारला तरच गावाचा विकास होईल. शाळेच्या भौतीक सुविधा व इतर गरजा पुर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. शाळेला सर्वोतोपरी सहकार्य राहिलच असे, आश्वासन पालकांना व शाळेला दिले.
पालक मेळावा उत्साहात
शरद बेलपत्रे यांनी सुद्धा मार्गदर्शन करतांना सांगितले की, पालकांनी शाळेत येवून शिक्षकांना भेटून आपल्या पाल्याविषयी शहानिशा करावी.एखाद्या विदयार्थ्यास शिक्षकांनी शिक्षा केली तर शिक्षकांवर संताप करू नये. पालक मेळाव्यास पालकांची उपस्थिती ही लक्षणिय होती.पालकांनी पालक मेळाव्या बद्दल तसेच शाळेबद्दल आणी शैक्षणिक बाबतीत पालकांनी समाधानकारक मत व्यक्त केले. मोठा पालक मेळावा हा प्रथमच झाल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. पालक मेळाव्यास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक दिनेश गाडे यांनी केले व आभार मानले.