जळगाव- चाळीसगाव येथील सायगाव येथील दिपीप गोपाळराव सोनवणे यांच्या जागेवर जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सोनवणे कुटूंबीय जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसले आहेत. सायंकाळी ७.3० वाजता अचानक उपोषणकर्ता महिला सरोजिनी सोनवणे यांची प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यातआले आहे.
बुधवारी आमरण उपोषणाचा सोनवणे कुटूंबीयांचा तिसरा दिवस होता. परंतू, एकही अधिकारी उपोषकर्त्यांची भेट न घेतल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली़ तोच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांची देखील अद्याप उपोषणकर्त्यांची भेट घेत मागण्यांबाबत चर्चा केलेली नाही.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी अचानक उपोषणकर्त्या वृध्द महिला सरोजिनी सोनवणे यांची अचानक प्रकृती अत्यावस्थ झाली. याबाबत तेथे उपस्थित सामाजिक कार्यकर्त्ते शिवराम पाटील यांना कळताच त्यांनी जिल्हा रूग्णालयात संपर्क साधला़ वैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळी येऊन सरोजिनी यांची तपासणी केली़ प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना त्वरीत जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. यानंतर कुटूंबातील इतर सदस्यांनी उपोषणास्थळी येऊन आंदोलन सुरू ठेवले.