जळगाव: जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे हे कामानिमित्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या दालनात गेले असता, सीईओ आणि चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात जोरदार शाब्दीकवाद झाला. यातूनच चंद्रशेखर अत्तरदे यांनी जिल्हा परिषद भवनात दांगडो घालत सीईओ यांना शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी २० रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे सीईओ यांच्या दालनात कामानिमित्त गेले होते, यावेळी सीईओ यांनी सदस्या पती चंद्रशेखर अत्तरदे यांना ‘हू आर यू’ म्हटले, याचाच राग चंद्रशेखर अत्तरदे यांना आला, त्यामुळे त्यांनी जि.प.भवनात आरडाओरड करत सीईओ यांना शिवीगाळ केली.