चोपडा । महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघा तर्फे चहार्डी-बुधगांव जि.प. गटातील नवनिर्वाचित जि.प.सदस्या प्रा.डॉ. निलम शशिकांत पाटील यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकार्यां सह शिक्षक,शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात याच गटातील स्थानिक रहीवाशी असलेले रामकृष्ण पाटील, मिनल पाटील, शैला पाटील, हरीभाऊ बाविस्कर, योगेश पाटील यांचेतर्फे प्रातिनिधीक स्वरूपात नव निर्वाचीत जि.प.सदस्या प्रा.डॉ. निलम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस योगेश सनेर यांनी आपल्या मनोगतात आमची शिक्षक संघटना ही कोणत्याही पक्षाशी संबधीत नसून आम्ही सरस्वतीचे पुजारी असून लोकशाहीत प्रा.डॉ. निलम पाटील यांचेसारख्या उच्चविद्याविभूषीत महिला जळगांव जिल्हा परिषदेत निवडून गेल्याचा विशेष आनंद आहे.
संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना स्वाभिमानाचे धडे: प्रशासनाने ज्यावेळी शिक्षकांवर अन्याय केला, त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना स्वाभिमानाचे धडे दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या शिक्षक संघटनेचे नाव आदराने घेतले जाते. सुशिक्षीत लोकप्रतिनिधी असल्यास त्यांना सर्व सामान्यांची बाजू प्रभावीपणे मांडता येणे शक्य असल्याने तसेच शासननिर्णयाचा योग्य अर्थ लावता येत असल्याने संघटने चे काम हलके होते. यावेळी पंचायत समिती माजी सभापती भारती बोरसे यांचेसह डॉ.रविंद्र पाटील, प्रा.शशिकांत पाटील यांचेसह ग.स.चे संचालक राजेंद्र साळूंखे तसेच राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक व शिक्षिकां सह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.