जीएसटीचे नियम व अटी समजून घेणे अवघड नाही

0

जळगाव । दी इंन्स्टीटूट ऑफ चार्टर्ड अंकौटंट्स ऑफ इंडीया अर्था ‘आयसीएआय’ ही चार्टर्ड अंकौटंट्स व्यक्तीची राष्ट्रीय संस्था असून या संस्थेचे पदाधिकारी यांनी शुक्रवार रोजी शहरातील संस्थेच्या शाखेला भेट देवून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेल्या जीएसटी संदर्भात व्यापार्‍यांसह नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र हा जीएसटी सोपा कसा आहे. याबाबत चेअरमन पल्लवी मयूर, विष्णू अग्रवाल, सर्वेश जोशी यांनी पत्रकार परीषदेत माहीती दिली.

जीएसटी लागू होण्याच्या आगोदर संस्थेच्या निगडीत असलेल्या सर्व सीए यांनी जीएसटी संदर्भात सखोल माहिती देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने येणार्‍या भावी सीए यांनाही याबाबत मोलाचे मार्गदर्शन या संस्थेमार्फेत केले जात आहे. ‘आयसीएआय’चे मुंबई, कोलकत्ता, कानपूर, दिल्ली यांसह चेन्नई अशा पाच ठिकाणी रिजन कार्यालय असून उत्तर भागातील महाराष्ट्र, गुजरात आणि दिव व दमन मधील जवळपास 50 हजार सीए यांनी सीए कोर्स उपक्रम पुर्ण केला आहे.

मुंबईच्या अंतर्गत 35 शाखा आहे. त्यात जळगाव या शाखेचा समावेश असून या संस्थेत 350 चार्टर्ड अंकौटंट्स तर 1 हजारहून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून जुलै सीएच्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. येणार्‍या काळात विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा चांगला फायदा होणार असल्याची माहिती यावेळी चेअरमन पल्लवी मयूर यांनी दिली. शासनाच्या नियमाप्रमाणे अभ्यासक्रमात बदल झाला पाहिजे त्यानुसार 2003 नंतर 2017 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून सुधारित अभ्यासक्रमात बदल झालेला आहे. आधी अभ्यासक्रमात 200 मार्काचे वस्तूनिष्ट पर्यायचे प्रश्‍नपत्रिका होती ती आता सुधारित 100 मार्काचे वस्तूनिष्ट आणि 100 मार्काचे लेखी असे स्वरूप असल्याचे उपस्थितांना सांगितले.