मुळशी । मुळशी तालुका भाजप युवा मोर्चातर्फे केंद्र सरकारच्या जीएसटी आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीचे स्वागत आनंदोत्सवाने करण्यात आले. भापज युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोटावडेफाटा येथील चौकात पेढे वाटले. प्रदेश सचिव देवकाते, जिल्हा युवा मोर्चाचे प्रभारी सुदर्शन चौधरी, जिल्हा सरचिटणीस नवनाथ पारखी, उपाध्यक्ष श्याम गावडे यावेळी उपस्थित होते. मुळशी तालुका भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सोपान बागडे, केतन देशमुख, अंकुश मरगळे, विजय मरगळे, अमोल धोत्रे, गिरीश मरगळे उपस्थित होते. मारणे यांनी स्थानिक लोकांना जीएसटी व कर्जमाफीबद्दल माहिती दिली.