पिंपरी-चिंचवड : जीएसटी करप्रणालीत असणार्या तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रिज, कॉमर्स, सर्व्हिसेस अॅण्ड अॅग्रीकल्चरलचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जीएसटीचे आयुक्त राजेश जलोटा यांना निवेदन दिले आहे. जीएसटीच्या दरात वाढ सरासरी व्हॅटपेक्षा 15 टक्क्यांनी झाल्याने व तिन्ही आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाही काळात झाल्याने औद्योगिक क्षेत्राच्या आयात-निर्यातीस जबरदस्त झटका बसला आहे.
ग्राहकांना 10 ते 12 टक्क्यांनी महागाईला तोंड द्यावे लागत आहे. जीएएसटीमुळे वाढलेल्या दरांमुळे लोखंड, स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियम यांच्या प्रति टन दरात 4000 ते 10000 पर्यंत वाढ झाली आहे. मध्यंतरीच्या काळात जीएसटी लागू झाल्याने कच्चा माल ते सेवा यात वाढ झाली आहे. म्हणून जीएसटीतील तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.