मुंबई । औषधांवर लावण्यात आलेला जीएसटी आणि अवैधरित्या सुरू असलेली ऑनलाईन औषध विक्री बंद करण्यासाठी ‘महाराष्ट्र विधी व वैद्यकीय प्रतिनिधी’ (फेडरेशन ऑफ मेडिकल अॅन्ड रिप्रेंझेटटिव्हस असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेतर्फे मुंबईतील भायखळा येथून आझाद मैदानापर्यंत महारॅली काढण्यात आली.सरकारकारने औषधांवरील जीएसटी रद्द करावा ही मागणी आता चांगलीच जोर धरू लागली. यासाठी फेडरेशन ऑफ मेडिकल अॅन्ड रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशन ऑफ इंडियाकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी 15 हजार औषध विक्रेते आणि वैद्यकीय प्रतिनिधी मुंबईत दाखल झाले होते.
औषधांच्या किंमती महागल्याने सामान्यांची अडचण
महाराष्ट्र विधी व वैद्यकीय प्रतिनिधी या संघटनेचे महासचिव शंतनू चॅटर्जी म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात जेनेरिक औषध स्वस्त नाही. ब्रॅन्डेड जेनेरिक औषधांच्या किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्याजोग्या नाहीत. त्यातच औषधांवर लावण्यात आलेल्या जीएसटीमुळे औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य गरजू रुग्णांना याचा सर्वाधिक फटका बसतोय.
औषधे स्वस्त करण्याचा सुरू होता खटाटोप
1‘चलो मुंबई, सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी’ या नावाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या वाढत्या महागाईत सरकारने औषधांवर जीएसटी कर लादल्याने सर्व औषधांच्या किंमतीत दुप्पटीने वाढ झालीये. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणार्या उपकरणांच्या वस्तूंवरही कर लावल्याने शस्त्रक्रियांचा खर्चही वाढला. एकूणच जीएसटीकरामुळे उपचार महागले आहेत.
2 महाराष्ट्र विधी व वैद्यकीय प्रतिनिधी (मुंबई) चे महासचिव श्रीकांत फोपसे म्हणाले, आम्ही औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. जीएसटीमुळे औषधांच्या किंमतीत सरसकट वाढ झाल्याने अनेक महिन्यांपासून विविध मार्गाने जीएसटी हटवण्यासाठी सरकारकडे विनवणी करण्यात येतेय. जनेतच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.