मुरुड जंजिरा | घरगुती गणपतीची सजावट करण्यासाठी थर्माकोलला मोठी मागणी असते. थर्माकोलचा व्यवसाय करणारे दरवर्षी पाच टक्के कर भरत होते. मात्र, यंदा थर्माकोलवर २८ टक्के जीएसटी भरावा लागत असल्याने दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती सजावटीसाठी उपलब्ध असणाऱ्या थर्माकोल मंदिराचे दर चारशे ते चार हजारापर्यंत झाले आहेत.
मागील वर्षी मंदिरांची किंमत दोनशेपासून ते तीन हजारांपर्यंत होती. मात्र, यंदा जीएसटीमुळे दरात वाढ झालेली आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार यंदा बाहुबली, बालाजी आदी स्वरूपात मंदिरे तयार करण्यात आली आहेत. वॉटर फाउंटन्स थर्माकोलला अधिक मागणी आहे. थर्माकोल मंदिर एकदा खरेदी केल्यांतर दोन ते चार वर्षे पुनः पुन्हा वापरता येते. थर्माकोल मंदिर खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात.