मुंबई – देशात सर्वात मोठी आणि सोन्याची अंडी देणार्या व दररोज करोडो रुपयांचे उत्पन्न देणारी मुंबई महापालिकेची जकात येत्या दोन महिन्यात बंद होणार आहे. त्यामुळे जकात नाकेही बंद करावे लागणार आहेत. या नाक्यांच्या जागांवर अतिक्रमण होवू नये यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी भाजपने केली आहे.
मुंबईत सुमारे दीड कोटी जनता राहत असून या लोकांना पालिका मुलभूत सेवा सुविधा पुरवत असते. यासाठी महापालिकेला दररोज करोडो रुपयांचे उत्पन्न जकातमधून मिळत असते. त्यामुळे ही श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जात आहे. या जकात नाक्यांची शेकडो एकर जमीन आहे. ही जागा पालिकेच्या मालकीची असून जकात रद्द होवून जीएसटी लागू झाल्यास त्या जागा रिकाम्या होतील. मात्र त्या जागांवर अतिक्रमणे होण्याची भिती भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीसाठी त्या जागांचा वापर करावा अशी मागणी त्यांनी केली. जकात चुकवून पालिकेचे नुकसा करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली.
पालिकेच्या पाच जकात नाक्यांमधून दररोज 16 कोटी 43 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. जकातीपोटी सहा हजार कोटी पालिकेला दरवर्षी उत्पन्न मिळत आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर हे उत्पन्न मिळणार नाही.
पालिकेचे जकात नाके
1- लालबहादूर शर-त्री मागॅ( मुलूंड पश्चिम )
2 – पूवॅ दृतगती महामागॅ( मुलूंड पूर्व )
3 – मुंबई – पनवेल हायवे
4- दहिसर
5- ऐरोली…