जीएसटीमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध

0

जळगाव । चालू आर्थिक वर्षांच्या मध्यापूर्वीच्या टप्प्यात वस्तू व सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतर कररचनेप्रमाणेच बचत व गुंतवणुकीचीही आता सवय बदलावी लागणार आहे. वाढीव सेवा करापोटी विमा, म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील खर्चही आता वाढणार आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीची आगामी दिशा काय असावी याविषयी मागर्दर्शन करताना बदललेल्या कर प्रणालीतील घटकांची माहिती सी.ए. प्रेमलता डागा यांनी यावेळी दिली.

शैक्षणिक जीवनात जीएसटी करप्रणालीचा असा अभ्यास गरजेचा
जी.एच.रायसोनी बिझनेस मेनेजमेंटमध्ये आयोजित जीएसटी कर प्रणाली संदभार्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संचालिका डॉ.प्रीती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, प्रा.रफिक शेख, प्रा.राज कांकरिया, प्रा.प्रशांत देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या जीएसटी कर प्रणाली जगात भारताच्या अगोदर 105 देशांनी लागू केला आहे परंतु भारतात ज्या पद्धतीने जीएसटी कर प्रणाली लागू केली आहे ती जगात एकमेव आहे. आपल्या व्यवसाय बद्दलचा वर्ष भारत 36 वेळा रिटर्न फाईल करून अंतिम वार्षिक एक अहवाल शासनाला देणे अनिवार्य आहे. त्यामुळे अर्थ विभागातील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. लागू झालेल्या कर प्रणालीमध्ये सी- जीएसटी, आय- जीएसटी, एस- जीएसटी, ही कर पद्धत कशी लागू केली जाते याच्या पाय-या सांगितल्या. तसेच अर्थ करणानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात जीएसटी कर प्रणालीचा कसा अभ्यास करून घ्यावा. नोकरी करा किंवा व्यवसाय त्याची कशी अंमलबजावणी ही कर प्रणाली समजून घेणे महत्वाचे आहे. यावेळी जीएसटी कर प्रणाली संदभार्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिलीत.