जीएसटीमुळे सीएवरील कामाचा ताण वाढला

0

पुणे । देशभरात जीएसटी लागू झाला असून 30 जुलैला या कराचा पहिला हप्ता भरायचा आहे. याबाबत अनेक समज गैरसमज सामान्यांच्या मनामध्ये असल्याने ते सीएकडे वारंवार फेर्‍या मारत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे.

या कराचे नेमके किती हप्ते भरायचे, प्रत्येक महिन्यात पैसे भरावे लागणार का अशा अनेक शंका उपस्थित होताना दिसतात. त्यामुळे व्यापारी, डॉक्टर सर्वचजण आता सीएकडे हेलपाटे मारत आहेत. आता तीन टॅक्स करदात्यांना भरावे लागणार असून सेंट्रल जीएसटी हा कर येत्या 30 जुलैपर्यंत भरावयाचा आहे. त्यासाठी ग्राहकांसोबत सीएंची गडबड सुरू आहे. यानंतर स्टेट जीएसटी हा कर राज्य सरकार त्यांच्या राज्यातील टॅक्स पेयर्सकडून वसूल करतील, तर इंटिग्रेटेड जीएसटी दोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल. त्यामुळे येत्या वर्षभर जोपर्यंत जीएसटी लोकांना समजत नाही तोपर्यंत सीए लोकांना रात्र दिवस काम करावे लागणार आहे.

रात्री उशिरापर्यंत चालतात कामे
सध्या अनेकांना जीएसटीबद्दल माहिती नाही. 30 जुलै रोजी पहिला हप्ता भरायचा असल्याने नागरीकांना त्याबाबतची संपुर्ण माहिती देऊन, त्यांच्या कामाची माहिती घेऊन बॅलेन्स शीट तयार करावी लागते. ही सर्व कामे रात्री 1 वाजेपर्यंत जागून करावी लागत आहेत.
-आनंद बिर्ला, सी.ए.