जळगाव– मनपाच्या विविध कामांसाठी मक्तेदार,पुरवठादार यांच्याकडून जीएसटी आकारणी केली जाते.कोणत्या सेवांवर आकारणी कशी करावी याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्याअनुषंगाने मनपा प्रशासनातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.दरम्यान,सनदी लेखापाल श्याम वक्ते यांनी मार्गदर्शन करुन मनपाच्या मक्तेदार आणि पुरवठादारांच्या शंकाचे निरसन केले.
मनपात्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात जीएसटी विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक सनदी लेखापाल श्याम वक्ते,मुख्य लेखापरिक्षक संतोष वाहुले,मुख्य लेखापाल कपिल पवार उपस्थित होते. यावेळी श्याम वक्ते यांनी कोणत्या सेवांवर जीएसटी कराची आकारणी कशी करावी,कोणत्या सेवांवर आकारणी करायची,आकारणीची पध्दत याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी मनपाच्या विविध कामांचे मक्तेदार,पुरवठादार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.