पुणे : देशासह विदेशातही आपल्या बाकरवडीचा डंका वाजवणार्या चितळेंच्या बाकरवडीची किंमत वाढली आहे. केंद्र सरकारने ‘एक देश एक कर’ या अंतर्गत लागू केलेल्या जीएसटीचा फटका चितळेंच्या बाकरवडीलाही बसला. बाकरवडीची किंमतीमध्ये किलोमागे तब्बल 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच इतर नमकीन पदार्थांमध्येही (फरसाण, आंबावडी, मिठाई) 20 रुपये प्रतिकिलो वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बाकरवडी खाणार्यांना आपला खिसा थोडा आणखी हलका करावा लागणार आहे.
चितळेंच्या बाकरवडीसह पुण्यातील आणखी एका फेमस खाद्य दुकानातील पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. बाजीराव रोडवरील वाडेश्वर भूवनमध्ये सकाळचा नाष्टा करण्यासाठी येणार्या पुणेकरांना इडली, डोसा, थालपीठसाठी जादाचे 10 रुपये मोजावे लागणार आहे.