मुंबई : महापालिकांचे सर्व कर रद्द करून केंद्रसरकारने जीएसटी कायद्याच्या माध्यमातून तो सर्व कर केंद्राकडे एकत्रित केला, मात्र त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून मुंबई महापालिकेला नुकसान भरपाई म्हणून शासनाच्या वतीने दर महिन्याला 647.34 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु याचा धनादेश दर महिन्याच्या 5 तारखेला मिळेल, असे सांगितले असले तरी 5 ऑगस्ट उजाडला तरी महापालिकेला या धनादेश मिळालाच नाही. त्यामुळे पहिला हप्त्याची रक्कम थाटामाटात देणार्या अर्थमंत्र्यांना महापालिकेला हा धनादेश देण्याचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अर्थमंत्र्यांनी स्वतःच्या आश्वासनला फासला हरताळ
जकात कर बंद होऊन पान 1 वरून 1 जुलैपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्यामुळे महापालिकेला दर महिन्याला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिला 647.34 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश 5 जुलै रोजी महापालिकेला देण्यात आला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा धनादेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सुर्पूत केला होता. या पहिल्या हप्त्याच्यावेळी मुनगंटीवार यांनी यापुढे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला 647.38 कोटींचा धनादेश महापालिकेला दिला जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु 5 ऑगस्ट उजाडला तरी हा धनादेश महापालिकेच्या लेखा विभागाकडे किंबहुना आयुक्तांच्या कार्यालयाकडे जमा झाला नव्हता. महापालिकेचे प्रमुख लेखापाल (वित्त) हेमलता येखे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी अद्यापही हा धनादेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. आम्हीही याच धनादेशाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.