जीएसटी परिषदेच्या अधीक्षकाला अटक

0

नवी दिल्ली : नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जीएसटी परिषदेच्या अधीक्षकास जवळच्या सहकार्‍याच्या माध्यमातून लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केली. या अधीक्षकाचे नाव मनीष मल्होत्रा तर त्याच्या मध्यस्ती सहकार्‍याचे नाव मानस पात्रा असे आहे. सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केल्याचे सीबीआयने सांगितले. सीबीआयने जीएसटीच्या अधिकार्‍याला लाचप्रकरणात अटक केल्याची ही पहिलीच घटना आहे.