जीएसटी लागू केलेल्या देशांमध्ये वाढतेय महागाई

0

1 जुलैनंतर आता भारतात जीएसटीचे भविष्य ठरणार आहे. देशात असेही देश आहेत, जे जीएसटी लागू करून फसले आहेत. या कररचनेमुळे होणारे नुकसान ते सहन करत आहेत. कॅनडाला जीएसटीचा कर दोन वेळा कमी करावा लागला, सिंगापूरात 1994साली जीएसटी लागू करण्यात आला, तेव्हा महागाई वाढली. हेच मलेशियामध्ये घडले. या देशांना अडीच वर्षांतच जीएसटीच्या तुटी दिसून आल्या. याउलट न्युझीलॅण्डने जीएसटी 10 टक्के लागू केला होता, तो त्यांना काही वर्षात 12.5 टक्के वाढवावा लागला. त्यानंतर 2015मध्ये 15 टक्के वाढवला. काही दिवसांपूर्वी ब्रिटेननही 20 टक्के जीएसटी वाढवला होता. तर ऑस्ट्रेलिया 15 वरून 19 टक्के वाढवण्याच्या तयारीत आहे. यावरून स्पष्ट होते की, ज्या देशांमध्ये जीएसटी लागू करण्यात आला, त्यामध्ये महागाई अधिक वाढत केली आहे. 30 देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट यांच्या अनुसार आतापर्यंत एकूण 21 देशांनी 2009-2011 या कालावधीत जीएसटी कर वाढून तो 17.6 वरून 19.1 टक्के झाला आहे.

फ्रान्स देशाने टॅक्स चोरी थांबवण्यासाठी सर्वात आधी जीएसटी लागू केला. यानंतर आजवर 160 देशांनी हा कर लागू केला. ब्राझिल, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये राज्य आणि केंद्र दोघांकडून जीएसटी कर लागू करण्यात आला आहे. या सर्व देशांच्या रांगेत भारताचा सामावेश झाला आहे. पाकिस्तानात जून 2013 पासून जीएसटी लागू आहे मात्र त्यासोबत सेवा कर आणि अन्य करही लागू आहेत. भारतात जीएसटी कर चार तुकड्यांमध्ये विभागण्यात आला आहे. 5,12,18 आणि 28 टक्के असा हा कर निर्धारित करण्यात आला आहे. ऑस्टे्रलिया, मलेशिया, न्युझीलॅण्ड, सिंगापूर, पाकिस्तान आणि चीन या देशांतील जीएसटीनंतर त्या देशांतील किंमती भारताच्या तुलनेत कमीच आहेत. या देशांमध्ये 0,6,15,7,17 टक्के अशी कर रचना आहे.

विशेष म्हणजे आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत जीएसटी कर लागू नाही. याठिकाणी कर रचना ठरवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आले आहे. आतापर्यंत न्युझिलॅण्डमध्ये जीएसटी कराचे गुणगाण गायले जात आहे. कारण तेथे सर्व वस्तूंवर एकाच टक्केवारीत दर आकारणी करण्यात आली आहे. मात्र भारतात असे करणे अशक्य असल्याचे आधीच वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.