1 जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे, त्याचा परिणाम हळूहळू भारतीय बाजारपेठेवर दिसू लागला आहे. त्यामुळे काही वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत, तर काहींच्या कमी झाल्या आहेत. नुकतेच एप्पल कंपनीने त्यांच्या मोबाईलच्या किंमती कमी केल्या आहेत. आता चायना इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती करणारी आसूस या कंपनीनेही त्यांच्या मोबाईलचे दर घटवले आहेत. जीएसटीनंतर मोबाईलचे दर वाढणार होते, मात्र स्मार्टफोनच्या किंमतींबाबत वेगळेच चित्र दिसू लागले आहे. आसूसच्या मोबाईलच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. त्यांच्या झेनफोन 3, झेनफोन 3 मॅक्स, झेनफोन 3 एस मॅक्स या मोबाईलच्या किंमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या मोबाईलच्या दरात 3 हजार रुपये घट होणार आहे. यानुसार 19 हजार 999 रुपयाच्या मोबाईलची किंमत 16 हजार 999 रुपयांपर्यंत खाली घसरू शकते. यासोबत झेनफोन 3 मॅक्सवर 1 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. तोही 15 हजार 999 रुपयांमध्ये मिळणार आहे. झेनफोन 3 एस मॅक्सच्या किंमतीमध्ये 2 हजार रुपयांचा कट येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन 12 हजार 899 रुपयांना मिळू शकते. या फोनमध्ये खास फिचर मिळणार आहे. त्यामुळे ग्राहक अधिकाधिक या मोबाईलकडे आकर्षित होणार आहेत.