श्रीनगर – वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या कार्यान्वयनावरुन तसेच सरकार करीत असलेल्या कथित गळचेपी विरोधात जम्मु आणि काश्मीर राज्यातील दुकानदारांनी आणि व्यावसायिकांनी बुधवारी बंद पुकारला.
हा संप जम्मु काश्मीर समन्वय समितीने पुकारला. जम्मुमधील बहुतांश दुकाने बंद होती. समितीच्या कार्यकक्षेत अनेक उद्योगधंदे, दुकाने आणि संस्था येतात. त्यामुळे संपूर्ण राज्याचा व्यापार ठप्प झाला. बंद दरम्यान पोलिसी बळाचा वापर झाला आणि व्यापाऱ्यांना अटकही करण्यात आले. विधानसभेवर हल्लाबोल करण्यासाठी व्यापाऱ्यांचा जमाव जात होता. त्यामुळे आंदोलकांना अटक करावी लागली, असे सूत्रांनी सांगितले. संपात सार्वजनिक दळणवळण व्यवस्था मात्र सुरळीत होती.