जीएसटी संदर्भात रविवारी व्यापार्‍यांसाठी शिबिर

0

जळगाव। जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे रविवार रोजी 4 जुनला व्यापारी-व्यावसायिक वर्गासाठी जीएसटी विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जळगावचे ज्येष्ठ कर सल्लागार अनिल शहा हे जीएसटीमधील तरतुदी, लाभ आणि अंमलबजावणी या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून एकाच प्रकारची करप्रणाली (जीएसटी) लागू होत आहे. या नव्या कायद्याविषयी सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित आहे.

यात वस्तू व सेवाकरासंदर्भातील तरतुदींची सविस्तर माहिती शहा देतील.हे शिबिर जिल्हा नियोजन समिती सभागृह (जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 3.30 वाजता होणार आहे. यात सहभागी होणार्‍या सभासदांना लक्ष्मी हिंग यांच्याकडून जीएसटी मार्गदर्शन पुस्तिका देण्यात येईल. ही माहिती जिल्हा व्यापारी महामंडळाचे सरचिटणीस ललीत बरडीया यांनी दिली.

केंद्रीय मंत्र्यांना फामचे शिष्टमंडळ भेटले
जीएसटीमधील काही दुरूस्त्यांच्या संदर्भात फाम (असोशिएशन ऑफ महाराष्ट्र) चे प्रतिनिधी मंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटले. फामने यापूर्वी मुख्यमंत्री व राज्याच्या अर्थमंत्री यांना निवेदन दिले आहे. आता फामचे अध्यक्ष विनेश शहा, सरचिटणीस आशिष मेहता, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, विजय भुता यांनी केन्द्रीय वित्त मंत्री अरुण जेटली व कैबिनेट मंत्री अर्जुनराम मेघवाल यांची भेट घेवून जीएसटीमधील अपेक्षित सुधारणांविषयी निवेदन सादर केले असल्याची माहिती फामचे उपाध्यक्ष ललीत बरडीया यांनी दिली.