जीटीपी महाविद्यालयात थॅलेसॅमियावर व्याख्यान

0

नंदुरबार । जी.टी.पाटील महाविद्यालयातील व्हीएलसी हॉलमध्ये येथे जी.टी.पाटील महाविद्यालय जिमखाना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसॅमिया या विषयावर जनजागृतीपर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.आर.कासार तसेच प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून डॉ.अर्जुन लालचंदाणी, उल्हासनगर येथील जवाहरलाल दुदानी व उपप्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांपैकी श्री.दुदानी यांनी चित्रफितीद्वारे थॅलेसॅमिया रोग कशाप्रकारे शरिरात वास्तव करतो व त्याचे दुष्परिणाम मुल जन्माला येण्याआधी व नंतर सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल व कुपोषणाचे प्रमाण पाहता तरुण युवक-युवतींनी लग्नापूर्वी व 18 वर्ष वय पूर्ण झाल्यावर थॅलेसॅमिया टेस्ट करण्याचे आवाहन व सल्ला दिला.