जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0

खडका गावातील दुर्दैवी घटना; अपघातग्रस्त वाहने जप्त

भुसावळ: भरधाव जीपने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना तालुक्यातील खडका येथे गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी जीप चालकाविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात जीप चालक नितीन सुरवाडेदेखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भरधाव जीप दुचाकीवर धडकली
खडका गावातील दुध डेअरीजवळून गुरुवारी सकाळी किन्ही येथील कल्पेश दिलीप फिरके (20) हा तरुण दुचाकी (एम.एच.19 एच.5158) ने जात असताना भरधाव येणार्‍या जीपे (एम.एच.19 ए.सी.0209) ने जोरदार धडक दिल्याने कल्पेश गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास उपचारार्थ हलवल्यानंतर रुग्णालयात त्याचे निधन झाले. या अपघात प्रकरणी सुनील कार्तिक फिरके (किन्ही) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून जीप चालक नितीन सुरेश सुरवाडे (वेल्हाळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात जीप चालकदेखील जखमी झाला आहे. अपघातग्रस्त जीप तसेच दुचाकी तालुका पोलिसांनी जप्त केल्याची माहिती तालुका पोलिसांच्या सूत्रांनी दिली. तपास उपनिरीक्षक सचिन खामगड करीत आहेत.