जीप-ट्रॅक्टर अपघातात पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

0

नायगाव फाट्याजवळ गिट्टीने भरलेल्या ट्रॅक्टरचे फालक उघडल्याने अपघात

मुक्ताईनगर- गिट्टीने भरलेल्या ट्रॅक्टरचे अचानक फालक उघडून ते जीपवर आदळून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना नायगाव फाट्याजवळ शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील दाम्पत्य बर्‍हाणपूर तालुक्यातील दहिहंडी गावचे रहिवासी आहेत. सुभाष काशिनाथ कोळी (42, रा.दहीहंडी, ता.बर्‍हाणपूर) हे त्यांच्या पत्नी आशाबाई सुभाष कोळी (40, दहीहंडी, ता. बर्‍हाणपूर) सह महेंद्रा जीप (क्रमांक एम.पी.12-7555) ने जात असताना नायगाव फाट्याजवळील वळणावर मुक्ताईनगर येथील महावीर दिलीपचंद्र बोथरा यांच्या मालकिचे ट्रॅक्टर गिट्टी घेऊन येत असताना अचानक ट्रॅक्टरचे फालके अचानक उघडून महेंद्रा जीपवर आदळून आशाबाई यांचा मृत्यू झाला तर सुभाष कोळी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ जळगावात हलवण्यात आले. या जीपमध्ये अन्य काही जण असल्याचे सांगण्यात आले मात्र त्यांना किरकोळ जखमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.