जीवघेण्या स्पर्धेत मुलांचा निखळ आनंद हरवत जाण्याची भीती

0

चोपडा । स्पर्धेच्या वातावरणात जीवघेणी परीक्षा सुरू झाली आहे, करिअर व्हावे यासाठी, पैसे मिळविण्यासाठी हि जीवघेणी शर्यत सुरु आहे. त्यासाठी पालक मुलांमध्ये भीती निर्माण करतात, बालवाडीपासून मुलांची शिकवणी लावणारे पालक ही आहेत. मुलांचा पाया पक्का होण्यापेक्षा त्यांचे पाय पक्के होऊ द्यावेत. पालक सध्या प्रत्येक शर्यतीत धावायलाच पाहिजे असे पालकांना वाटते. आपल्याला जे मिळाले नाही ते मुलांना मिळावे असे पालकांना वाटते, असे प्रतिपादन पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी मधील महेंद्र सेठिया यांनी ‘आव्हानांना सामोरे जाताना’ या विषयावर केले. ते विवेकानंद विद्यालयात 12 रोजी झालेल्या शिक्षण चिंतन परिषदेत बोलत होते.

पुढील काळात आत्ताची आव्हाने गळून पडतील
पुढच्या काळात आव्हाने पाहिले तर ही आव्हाने गळून पडतील अशी आव्हाने येणार आहेत. विद्यार्थ्यांना जर नवीन काही सुचले तर तसे करू दिले जात नाही. वास्तविक मुलांमध्ये खूप कुतुहुल असते. म्हणून सध्याची मुले अनेक प्रश्न विचारत असतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याला ते प्रश्न कधीच विचारू दिले जात नाही. आणि स्पर्धेत टिकण्यासाठी नको ते करायला लावणारे पालक आहेत. या जीवघेण्या स्पर्धेत मुलांचा आनंद हिरावला जात आहे. आपल्याला अडचणीना सामोरे जावे लागू नये म्हणून मुलांना आत्मविश्वासाने जगू दिले जात नाही. म्हणून सर्व मुलांना सहज उपलब्ध करून दिले जात आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आपण नको ते आपापल्या पाल्यांना देत आहोत, म्हणून पालकांना विचार करण्याची वेळ आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील होते. यावेळी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, सचिव डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, अ‍ॅड.रवींद्र जैन, डॉ.जयंत पाटील, अ‍ॅड.व्ही.डी. जोशी, डॉ.नरेंद्र शिरसाठ आदी होते.

विद्यार्थी गटातून शिकण्यास नकार
जिवघेण्या स्पर्धेत मुलांना एकट्याच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी धडपड करायला लावले जाते. मात्र विद्यार्थी गटातून शिकू दिले जात नाही. गट स्पर्धेत त्याला शिकू दिले जात नाही, शिक्षण प्रक्रियेत नवीन सुचनाला थारा दिला जात नाही. मुलांना क्रिएटिव्हिटी शिकू डोलू जात नाही, अभ्यासातून इतरत्र गेला तरी त्याला वाव दिला पाहिजे. माणसाकडे 180 प्रकारची बुद्धिमत्ता आहेत. यापैकी शिक्षण प्रक्रियेत फक्त 40 पैलू वापरले जातात. स्पर्धेमुळे तंदुरुस्त मुलाची संख्या कमी झाली आहे. विविध विचारसरणीने मुलाला संकुचित केले आहे. प्रबोधिनितील विद्यार्थी मात्र परीक्षेच्या दिवसापर्यंत खेळत असतांना यशस्वी झाले आहेत. सर्व उपक्रमात सर्व विद्यार्थी भाग घेत होती म्हणून मुले यशस्वी झाली आहेत. जीवघेण्या शर्यतीचा पालकांनी बाऊ केला आहे याचे परिणाम गंभीर आहेत. आमच्या देशात काय चालू आहेत हे समजू दिले जात नाही, असे सेठिया म्हणाले. सूत्रसंचालन पवन लाठी यांनी तर परिचय राध्येश्याम पाटील यांनी केले.