भुसावळ । इंडियन रेडक्रॉस सोसायटी महाराष्ट्र स्टेट ब्रांच व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आपत्ती निवारण प्रशिक्षण शिबीरात भुसावळ येथील जिवनदायी बहुद्देशीय संस्थेअंतर्गत जिवनरक्षक दलाचे कार्यकर्ते प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले. या कार्यकर्त्यांना संस्थेच्या तज्ञ व्यक्तींमार्फत आपत्कालीन बचावाचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रमाणपत्र देऊन गौरव
त्यांना पाच दिवसांचे आपत्ती निवारण व मानवी शरिरातील शरीररचना व रक्त पुरवठा व नैसर्गिक आपत्ती निवारणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात एलॅन मेशन, संदीप भोई, लहु दळवे यांची निवड करण्यात आली होती. तत्यांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.