जीवनशैलीतील बदलामुळे हदयविकार रूग्णांमध्ये वाढ

0

जळगाव । स्पर्धेचे युग, बदलली जिवनशैली तणाव यामूळे हदयविकार रूग्णामध्ये वाढ होत असून ही आता जागतिक समस्या बनली आहे. येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात नव्याने रूजू झालेले डीएनबी कार्डीयाक तज्ञ डॉ. रमेश मालकर यांनी हे मत व्यक्त केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात हृदयविकार असलेल्या रूग्णांसाठी मोफत एन्जीओप्लास्टी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांतर्गत हृदयविकार असलेल्या रूग्णांची एन्जीओग्राफी तपासणी करून त्यांना उपचारासाठी सल्ला दिला जात आहे.

तीन दिवसात 26 रूग्णांची एन्जीओप्लास्टी
या शिबीरात डीएनबी कार्डीयाक तज्ञ डॉ. रमेश मालकर हे रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करत आहे. मोफत एन्जीओप्लास्टी शिबीरात तीन दिवसात 26 रूग्णांची एन्जीओप्लास्टी करण्यात आली. आज नऊ जणांची एन्जीओप्लास्टी मोफत करण्यात असुन त्यांना उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. खान्देशात हे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगीतले या शिबीरासाठी हृदयालयाची एक टिम कार्यरत आहे. तरी जिल्ह्यासह खान्देशातील रूग्णांनीही या मोफत एन्जीओप्लास्टी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.