जळगाव : जीवनात गुरुची महिमा ही अगाध असते, गुुरुची जात, धर्म पाहू नका, त्याच्याकडून ज्ञान घेणे महत्त्वाचे असते. जीवनात माता, पिता आणि गुरुची सेवा व्हायला हवी. आईचे मन कधीही दुखवू नका, असे झाले तर त्याच्या जीवनाला कधीच अर्थ नाही. त्याला स्वर्ग प्राप्त होत नाही, असे सांगून संताच्या कोणत्याही जाती नसतात, संत हा संतच राहतो. समाज या महात्म्याकडे आदर्श नजरेतून पाहत असतो. त्यांचा सन्मान आवश्यक आहे,असे विचार कथासम्राज्ञी साध्वी देवकन्या सुगनाबाईसा (दीदी) यांनी श्रीमद् देवी भागवत संगीतमय कथेत निरुपणाद्वारे मांडला. देवी चंडीचे रुप तथा महिषासूर वध, शुंभ, निशुंभचा वध आहे आणि रक्ताच्या नात्यांचा उद्धार या विषयावर साध्वी दिदींनी प्रवचनात साध्या शब्दात भक्तांना माहिती सांगितली.
आयुष्यात कधीच आईचा अपमान करु नका
सागर पार्क येथे देवी भागवत कथा सुरु आहे. आज कथेचा तिसरा दिवस होता. विविध या भजनप्रसंगी अनेक भक्त तल्लीन होऊन नृत्याचा ठेका धरतात.होते. कथाकार कथासम्राज्ञी देवकन्या सुगणाबाईसा दिदी आपल्या कथेच्या निरुपणप्रसंगी म्हणाल्या, जग खूप सुंदर आहे. जग आपल्या कर्तृत्वावर फिदा होत असत, आपणही जगावर फिदा व्हायला हवे, असे सांगून गुरुच्या महात्म्याचे वर्णन त्यांनी सोप्या शब्दात मांडले. राष्ट्रभक्ती व हिंदू संस्कृती विसरता कामा नये, आपला देश भारत आहे आणि देशाला भारत माता असे संबोधितो. या मातेचा आदर करायला हवा. प्रत्येक भारतीयाने आपल्या मातीबद्दल अभिमान बाळगायला हवा, असे सांगून आईचे महत्त्व खूप अगाध आहे. आईचा कधी अपमान करु नका. जीवनात सकारात्मक विचार समोर ठेवून अहंकार दूर सारण्याचा प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.