जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना मिळणार ऑनलाईन परवानगी

0

परिवहन कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित

जळगाव”– जगभरातील अनेक देशांमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक गंभीर स्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होत आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक व खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवांचा निरंतर पुरवठा सुरु राहण्यासाठी जीवनाश्यक वस्तुंची माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना विशेष स्टिकर देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे 26 मार्च, 2020 पासून 24 तास नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला आहे. तसेच जीवनावश्यक वाहतुक करणाऱ्या ज्या वाहनमालकांना आपल्या वाहनांसाठी पासची आवश्यकता असेल. त्यांनी समक्ष अथवा परिवहन विभागाच्या mh१९@mahatranscom.in या ईमेलवर वाहनक्रमांक व सर्व वैध कागदपत्रांसह विनंती अर्ज सादर करावा. कागदपत्रांची तपासणी करुन त्यांना ऑनलाईन परवानगी देण्यात येणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनमालकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.