रावेर (प्रतिनिधी) : दंगलीची संचारबंदी असलेले शहर सोडून तालुक्यातील इतर ठिकाणी सर्व जिवनावश्यक वस्तुंमध्ये येणारे दुकाने यापुढे 24 तास उघडे ठेवण्याचे आदेश तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी आज काढले आहे.
या बाबत वृत्त असे की, रावेर दंगल असल्याने संचारबंदी आहे यामुळे शहर सोडून तालुक्यातील इतर ठिकाणाची सर्वसाधारन जनतेला जिवनावश्यक वस्तु किराणा दुकाने औषधांची दुकानां मधून सामान घेता यावे म्हणून यापुढे 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. तसेच कोरोना महाभयानक वायरस पासुन बचावासाठी संबधित दुकादारांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच दोन ग्राहकामधील अंतर निर्जतुकीकरण स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन व सूचनांचे सर्वांनी पालन करण्याचे अवाहन तहसिल प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.