जीवन केंद्रातर्फे व्यसनमुक्तीवर जनजागृती

0

जळगाव । पद्मश्री डॉ. भंवरलालजी जैन यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त जिवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र व सेवाभावी संस्था मुक्ती फाऊंडेशनतर्फे स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हे विशेष समाजपयोगी कार्यक्रम राजीव गांधीनगर येथे राबविण्यात आले. तसेच स्वच्छतेसोबतच वाढते व्यसन व त्यांचे पुष्परिणाम यावर जनजागृती करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी राज्य शासनातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती राज्यसेवा पुरस्कार प्राप्त डॉ. बाळासाहेब कुमावत यांच्या हस्ते वेसनिल प्लस हे व्यसनमुक्तीचे प्रभावी औषध मोफत वाटप करण्यात आली. याप्रसंगी मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, डॉ. समीर साकळीकर, सुनिल महाजन,अवनिश पाटील, विनोद पाटील, गोपाल वालेचा, प्रितम कुमावर, ईश्‍वर जैन, मनोज सपकाळे, अश्‍विनी कुमावत, वैशाली उंटवाळे, हेमंत चिमणकर आदी उपस्थित होते.

औषधींचे केले वाटप
व्यसनमुक्तीसाठी वेसनिल प्लस हे आयुर्वेदिक प्रभावी औषध संपूर्ण राज्यात प्रमुख औषधी दुकानात उपलब्ध असून येणार्‍या काळात संबंध देशात व्यसनमुक्ती मोहिम राबवून वेसनिल प्लस हे आयुर्वेद औषध पोहचण्याचे पावन कार्य आपण करणार असून सोबतच व्यसनमुक्ती कार्यासाठी मोफत समुपदेशन केंद्र आपण सुरू करणार असल्याचे डॉ. बाळासाहेब कुमावत यांनी सांगितले.