जीवन मरणाच्या परिक्षेनंतर त्याची झेप थेट शालांत परिक्षेकडे

0

मुंबई (प्रतिभा घडशी) – मराठवाडा येथील सलिम शेख यांच्या मुलावर वॉक्हार्ट रुग्णालयात दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया झाली आहे. विशेष म्हणजे, एवढी मोठी शस्त्रक्रिया होऊनही त्या मुलाची शिकण्याची जिद्द एवढी मोठी की, तो मुलगा शस्त्रक्रिया झाल्या झाल्या थेट गावाला पोहचून त्याने शालांत परिक्षा दिली. हमदान शेख असे या 11 वर्षीय मुलाचे नाव असून त्याचे डॉक्टरांकडून आणि त्यांच्या शाळेतून कौतुक होत आहे.

मराठवाडा -बीड मध्ये राहणार्‍या सलिम शेख यांच्या मुलाला जन्मतः हृद्य रोग असुनही त्याचे निदान झाले नव्हते. मार्च महिन्याच्या सुरवातीला इयत्ता चवथीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी हमदान शेख (वय 11) हा आपल्या मित्राकडे गेला असताना तो चक्कर येऊन पडला. सुरुवातीला उन्हामुळे चक्कर आली असेल असा त्याच्या पालकांचा समज झाला. परंतु वांरवार त्याला उलटी व चक्कर येऊ लागल्यावर स्थानिक डॉक्टरांनी उच्च रक्तदाबाचे निदान केले. तेव्हा बीड मधील डॉक्टरांनी पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शेखला मुंबईत जाण्यासाठी सुचवले. बोरीवली येथील नातेवाईकांच्या मदतीने हमदानला मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आधुनिक सीटी स्कॅन व इतर तपासणीतून त्याला हृदयरोग असल्याचे निदान झाले. हृदयातून बाहेर पडणारी मुख्य वाहिनी, रोहिणी आकुंचित (कोक्र्टेशन ऑफ दे अ‍ॅरोटा) असल्याने शरीराला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नव्हता. हृदयातून निघणारी सर्वात मोठ्या धामीणीच्या (रक्तवाहिनी ) सुरुवातीला अडथळा होता, अशा वेळी कोरॅकटोप्लास्टी म्हणजेच या धमिनीजवळ स्टेण्ट बसवण्याची शस्रक्रिया सुचवली गेली. वोक्हार्ट हॉस्पिटलमधील हृदयविकार तज्ञ डॉ अनुप ताकसांडे यांनी ही शस्त्रक्रिया केली असून ही शस्त्रक्रिया त्यांनी मोठ्या प्रयत्नांतून यशस्वी केली. याबाबत डॉक्टरांचेही कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या श्स्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी हमदानला आरामाची सक्त ताकीद दिली होती. मात्र वर्ष वाया जाऊन नये म्हणून समदान शस्त्रक्रिया झाल्या झाल्या थेट आपल्या गावी गेला आणि त्याने परिक्षेचा पेपर सोडवला. हमदानच्या या जिद्द, चिकाटीला सलामच करावे लागेल.

डॉक्टरांपुढील आव्हान
समदानचे वय 11 असल्याने त्याच्या हृदयाची पूर्णतः वाढ झाली नव्हती. अशावेळी त्याचा रक्तदाब संतुलित ठेवून ही प्रकिया करणे एक वैद्यकीय आव्हान होते, परंतु वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आम्ही ही शस्रक्रिया पूर्ण केली. सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे विशिष्ट प्रकारच्या फुग्यांद्वारे (इरश्रश्रेेपी) बारीक/आकुंचित असलेल्या झडपा किंवा रक्तवाहिन्या या मोठ्या करता येतात. ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने एक तर ती बालकाच्या जन्मतःच केली जाते किंवा वयाच्या 40शी पार केल्यानंतर केली जाते. मात्र हमगानमध्ये रक्तदाबाचे प्रमाण संतुलीत करुन ही शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. डॉक्टरांच्या या प्रयत्नांना हमदानने चांगला प्रतिसाद दिल्याने ही दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.