मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील शासकीय दंत महाविद्यालयातील डॉक्तरांनी रुग्णांना मौखिक आरोग्य राखा, कर्करोग टाळा असा संदेश दिला. तंबाखू, धूम्रपान यासारख्या चुकीच्या सवयींमुळे आपले मौखिक आरोग्य बिघडते. परिणामी कर्करोगासारख्या भयंकर आजाराला बळी पडावे लागते. त्यामुळे जीवन सुंदर आहे. ते निरोगी ठेवा असे सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील शासकीय दंत विद्यालयांनी रुग्णालयात दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती मौखिक आरोग्य दिनानिमित्त करण्यात आलेला हा कार्यक्रम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. दातांचे आरोग्य कसे राखावे याविषयी पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. लहान मुलांचे २० दात, तरुणांमध्ये ३२ दातांचे आरोग्य राखलेच गेले पाहिजे असा संदेश या माध्यमातून पोहोचविण्यात आला. येथील विभागप्रमुख डॉ. राजेश गायकवाड यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.