जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; चौघा आरोपींची निर्दोष सुटका

0

भुसावळ- जामनेर रस्त्यावर जास्त हवा करतो, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत एकास तलवारीने मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील चौघा आरोपींची संशयाचा फायदा देत अतिरीक्त सत्र न्यायालयात न्या.एस.पी.डोरले यांनी सुटका केली. तक्रारदार संजय लोटन चौधरी (45) यांना 4 जुलै 2014 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चौघांनी मारहाण केल्याप्रकरणी बाजारपेठ संशयीत आरोपी विलास काशीनाथ जाधव, दत्तु श्रावण सपकाळे, धीरज विलास जाधव, मुकेश हरीचंद्र पवार (सर्व रा.कृष्णानगर, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. पाच साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपींना संशयाचा फायदा देत सुटका केली. आरोपींतर्फे अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.फिरोज शेख यांनी सहकार्य केले. सरकारतर्फे अ‍ॅड.संभाजी जाधव यांनी बाजू मांडली.