जी.एम.चौधरी तंत्रनिकेतनात मार्गदर्शन मेळावा

0

शहादा । महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई आणि जी.एम.चौधरी तंत्रनिकेतन शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन जी.एम.चौधरी तंत्रनिकेतनाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास इयत्ता दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांनी भूषविले. पूज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाचे प्रशासकीय समन्वयक मकरंद पाटील,शासकीय तंत्रनिकेत नंदुरबार येथील प्राचार्य एस.एल.अंधारे आणि किशोर दुबे हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पुजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

तंत्रशिक्षण एक समर्थ पर्याय
प्रास्ताविक तंत्रनिकेतनाचे प्राचार्य प्रा.बी.के.सोनी यांनी केले. प्राचार्य एस.एल.अंधारे यांनी तंत्रशिक्षण म्हणजे काय व तंत्रशिक्षण का आवश्यक आहे हे स्पष्ट केले. किशोर दुबे यांनी काळाबरोबर बदलणे कसे आवश्यक आहे हे सोदाहरण सांगितले. प्रा.डॉ.बी.एस.पाटील यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे चालविल्या जाणार्या विविध कोर्सेसची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात पी.आर.पाटील यांनी तंत्रशिक्षणाचे महत्व व तंत्रशिक्षण हा सध्याच्या काळात एक समर्थ पर्याय असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन.एस.पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी तंत्रनिकेत व तंत्रशिक्षणासंबंधीत स्लाईड शो प्रा.एस.पी.देशपांडे यांनी सादर केला. आभार प्रा.एस.पी.जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तंत्रनिकेतनातील सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी प्राचार्य प्रा.बी.के.सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.