जी.एम.दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळात रस्त्यांची डागडूजी

0

भुसावळ- मध्य रेल्वेचे जी.एम.डी.के.शर्मा हे 28 रोजी भुसावळ दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पीओएच शेड (विद्युत इंजिन कारखाना) चे वार्षिक निरीक्षण केले जाणार आहे. आरपीडी रस्त्यावर विद्युत इंजिन कारखाना असला तरी यारस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्याची मालकी पालिकेकडे आहे मात्र रस्त्याचे काम झाले नसल्याने रेल्वेनेच पुढाकार घेत मंगळवारी या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला. रस्त्याची डागडूजी होत असल्याने वाहनधारकांनी मात्र समाधान व्यक्त केले.

यावल रस्त्यावरील खड्डे बुजवले
यावल फॉरेस्ट नाक्याजवळील रस्त्यावरही मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता. या संदर्भात पीडब्ल्यूडी विभागाचे शाखा अभियंता कुरेशी यांनी एका ठेकेदाराला सूचना केल्यानंतर काही खड्डे मंगळवारी बुजवण्यात आले.