भुसावळ । तालुक्यातील साकेगाव येथे मंगळवारी सायंकाळी वाणीवाडी भागातील मोबाईल टॉवरखाली जुगाराचा डाव रंगात आला असतानाच सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने धाड टाकत साकेगावसह भुसावळातील 12 जुगार्यांना मुसक्या आवळण्यात आल्या. तीन दुचाकी, 10 मोबाईलसह 30 हजारांची रोकड मिळून दोन लाख 45 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाजारपेठचे कर्मचारी सुनील सैंदाणे, सुनील थोरात, दिनेश कापडणे, शहरचे सोपान पाटील व तालुक्याच्या अर्चना अहिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. गावठी दारूची विक्री करणार्या सुनीता शंकरनाथ या महिलेसही अटक झाली.
साकेगावसह भुसावळच्या जुगार्यांविरुद्ध गुन्हा
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुलाब पंडित सपकाळे (चांदमारी चाळ), विक्की प्रकाश ठाकूर (वाल्मीक नगर), सय्यद जफर सै.जमीर व अफजलखान असलमखान (पंचशील नगर, भुसावळ) व साकेगाव येथील अनिल ओंकार काळे व मंगेश रघुनाथ कुंभार (आंबेडकर नगर), विलास शांताराम धनगर, किसन गोविंदा धनगर (धनगरवाडा), बापू प्रकाश कुंभार, युनूस रहेमान पटेल, रमेश कृष्णा भोई यांचा समावेश आहे. 35 लीटर गावठी दारूही जप्त करण्यात आली.