जुगाराचा डाव उधळला; 13 जणांकडून 20 हजाराची रोकड हस्तगत

0
भुसावळ– शहरातील आनंद नगर भागात असलेल्या नवदुर्गा मंडळाच्या बाजूस जुगार खेळणार्‍या 13 जणांना शनिवार 23 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 हजार 870 रुपयांची रोकड देखील हस्तगत करण्यात आली आहे.
शहरात आनंद नगर भागातील खान्देशची आई नवदुर्गा मित्र मंडळाच्या बाजुला काही जण 52 पत्याचा झन्नमना पत्ता जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती असल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार ईआरटी पथकाने सापळा रचुन तेथे खेळणार्‍या रामचंद मुरलीधर धांडे, पंकज सुरेश जैन, मयुर नारायण सपकाळे, मुकेश भगवान पाटील, श्रीचंद साधु रमाणी, धिरज पंडीत वारगे, गोलु विठ्ठल कोल्हे, जितेंद्र मुरलीधर पाटील, विजय संतोष चौधरी, पिंटु रामधन शेरशाह, मनोज विजय पाटील, धिरज अर्जुन राणे, तेजस कृष्णा सरोदे या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांची सर्वांची अंगझडती घेतली असता 20 हजार 870 रुपयांची रोकड व 52 पत्याचा कॅट मिळुन आला. हेडकॉन्स्टेबल राजेंद्र साळुखे, पोलीस नाइक बंटी सैंदाणे, सुनील थोरात, साहील तडवी, प्रेमचंद सपकाळे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दिपक जाधव, सोपान पाटील, राहुल चौधरी यांच्या पथकाने हि कारवाई केली. या सर्वांवर बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल लतिफ शेख करीत आहे.