जुगार अड्ड्यावर पोलीस उपअधीकांचा छापा

0

जळगाव: शहरातील सुन्नी ईदगाह मैदानाजवळ बिसमिल्ला नगरमध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास छापा टाकला.

या कारवाईत 26 हजार 700 रुपयांची रोकड व तीन दुचाकी असा एकूण 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सलीम इदु पिंजारी वय 38 रा. सुप्रिम कॉलनी, बिसमिल्लानगर, ईश्‍वर मोरसिंग चव्हाण वय 37 रा. सुप्रिम कॉलनी, जावेद खान मनसफ खान वय 26 रा. ममता बेकरीच्या मागे सुप्रिम कॉलनी, करतार नारायण वंजारी वय 35 रा. जयभवानी चौक, नासीर गुलमा पटेल वय 23 रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी, राजू फकीरा पटेल वय 40 रा. सुप्रिम कॉलनी, ताजनगर या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मनोहर जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास गोंडू सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, विजय काळे, रविंद्र मोतीराया, किरण धमके, अशोक फुसे याच्या पथकाने ही कारवाई केली