जुगार अड्डयावरील 32 जणांची जामीनावर सुटका

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील पुरणाड फाटा येथील हॉटेल रावसाहेब येथे शुक्रवारी 19 मे रोजी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 34 जनांवर तीन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 32 जणांना शनिवारी 20 रोजी वैयक्तीक जात मुचलक्यावर सोडण्यात आले तर उर्वरीत दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन ताबा मिळाला त्याचीही न्यायालयाने लागलीच जामीन मंजुर केली.

याबाबत गेल्या अनेक वर्षांपासुन तालुक्यातील पुर्णाड फाटा येथे जुगार अड्डा व दारुचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहीती पोलिस प्रशासनास मिळाली त्यावरुन मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय कार्यालयाचे प्रभारी पदाचा पदभार सांभाळल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग निलोत्पल यांनी गेल्या अनेक वर्षापासून बिनदिक्कत पणे चालु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुप्त माहितीच्या आधारे अतिशय गुप्तपणे धडक कारवाई करण्यात आली. कारवाईत जुगार अड्ड्यावरुन तीन लाख चाळीस हजार रोख रक्कम तसेच 1 लाख 19 हजार किमतीची दारु जप्त करण्यात आली. सोबतच दहा दुचाकी वाहने व पाच चारचाकी वाहनानेही ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुंह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विनोद संतोष वितकर यांच्या फिर्यादीवरुन युवराज पाटील वय 46 रा पुरणाड , संदीप देशमुख वय 41 रा पुरणाड अशा दोघांवर विना परवाणा विदेशी दारु व बियर गैर कायदा विक्रीसाठीचा माल मिळून यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास पोलिस निरिक्षक अशोक कडलग हे करीत आहे.