धुळे । शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळ्यात वेगवेगळ्या भागांमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 30 जुगारींनाही अटक केली आहे. धुळे शहरातील प्रितम पॅलेस कॉम्प्लेक्सच्या दुकान नं. 2 मध्ये झन्ना-मन्ना जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन शहर पोलिसांनी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जुगार अड्डे्यावरछापा टाकला. या छाप्यात पोलीसांनी जुगार खेळणार्या एकूण 15 जणांना ताब्यात घेतले. यात जुगार खेळणार्या हितेश विनायक महाजन, राजू सदा वंजारी, संभाजी गणपत पाटील, संभाजी त्र्यंबक पाटील, प्रमोद दगडू बोरसे, कल्पेश अरविंद कासार, दिपक वसंत देव, कृष्णा दादाजी पाटील, नाना मुरलीधर वाणी, सागर कोळी, सचिन चव्हाण, संतोष माधवराव मराठे, अर्जून कैलास सरोदे, रविंद्र बाबूलाल चौधरी, सुरेश सोनार या जुगारींना अटक केली.
सहा अटकेत एक फरार
पोलीसांनी या पंधारा जणांकडून रोकड, मोबाईल, मोटरसायकल असा 3 लाख 23 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच एलसीबीने मध्यरात्री 12.10 वाजता धुळे शहरातील बारा पत्थर चौकातील गोल बिल्डींगजवळ असलेल्या घरावर छापा टाकला. यावेळी पथकाला या घरात झन्ना-मन्ना जुगार खेळला जात असल्याचे आढळले. या छाप्यात एलसीबीने 80 हजार 650 रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान छापा पडल्यानंतर अजिज शेख हा फरार झाला आहे. तर संग्रामसिंग राजपूत, युसूफ निसार सैय्यद, दिपक रामदास सूर्यवंशी, अकबर अली कैसर अली, मुशफ्फर अहमद, किशोर विश्वनाथ वाकडे या सहा जणांना अटक केली आहे.
झन्ना मन्ना खेळतांना अटक
एलसीबीच्या पथकाने धुळ्यातील आईस फॅक्टरीच्या आवारातील खोलीवर छापा टाकला. झन्ना-मन्ना खेळणार्या जुगारींकडून 61 हजार 600 रुपयांची रोकड, 6 मोबाईल, 3 मोटरसायकली, इन्व्हर्टर बॅटरीक असा 2 लाख 66 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला. जुगार खेळणार्या धिरज रामेश्वर परदेशी, शंकर गेंदालाल शिंदे, दिनेश अरविंद पाटील, सागर संजय जयस्वाल, सलीम रज्जाक पिंजारी, चंद्रकांत उत्तम चौधरी, गोकूळ केशव माळी, उद्देश जेरुभाई दरबार या आठ जणांना अटक केली आहे. जुगार अड्ड्यांवर पडलेल्या छाप्यांमुळे जुगारींमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.